खाऊच्या पानांपासून तेल काढण्याचे नवे तंत्र

नवी दिल्ली : आयआयटी खडगपूरमधील संशोधकांनी खाऊच्या पानांपासून तेल वेगळे करण्याची एक नवी पद्धत विकसित केली आहे. या तंत्रामुळे या प्रक्रियेतील कार्यात नवी सुधारणा होऊ शकते आणि या क्रियेतून वाया जाणार्‍या किंवा टाकाऊ घटकांमध्येही घट होऊ शकते. ‘आयआयटी’मधील एका अधिकार्‍याने याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या तंत्रासाठी एक नवे उपकरण विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये सध्याच्या तंत्राच्या तुलनेत तीस टक्के ऊर्जेची बचत केली जाऊ शकते.
तसेच पानांमधून मिळणार्‍या तेलाच्या प्रमाणात 16 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. खाऊच्या पानांमधून तेल काढण्याच्या सध्याच्या प्रचलित प्रक्रियेला आर्थिक व्यवहाराच्या समस्या आहेत. तसेच या प्रक्रियेत वाया जाणारे किंवा टाकाऊ घटकही अनेक असतात. या समस्येवर मात करण्यासाठी हे नवे तंत्र शोधण्यात आले आहे. प्रा. प्रशांत गुहा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे तंत्र विकसित केले आहे.

Back to top button