करपलेली भांडी अशी करा स्वच्छ; जाणून घ्या टिप्स

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अनेकवेळा महिलांना स्वयंपाक घरात पडलेला भयंकर मोठा प्रश्न म्हणजे करपलेली भांडी स्वच्छ कशी करायची. कधी कधी दुधाची पातेली गॅसवर ठेऊन विसरायला होतं आणि मग भांडे गॅसवर जळते किंवा कुकरमध्ये पाणी आटतं आणि कुकर खालून जळतो. असे जळलेले काळपट डाग काढण्यासाठी मग अक्षरशः हातामधली ताकद घासून घासून घालवावी लागते. अशी भांडी स्वच्छ करताना नक्की काय करायचं हे मग काही जणांना कळत नाही. कारण नेहमीच्या साबणाने अथवा लिक्विडने ही भांडी स्वच्छ होत नाहीत आणि अशी काळी भांडी बघून आपल्यालाही काही सूचत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

कोकने करा स्वच्छ

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातील कोकचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे भांडे काळे झाले आहे त्यामध्ये कोक टाकावे लागेल. असे केल्यानंतर हे भांडे पुन्हा गॅसवर चढवा आणि मंद आचेवर गरम करा. कोकमधून बुडबुडे येणं बंद झालं की प्लास्टिक ब्रश अथवा भांडी घासण्याच्या साबणाने हे स्क्रब करा आणि मग जळलेला भाग स्वच्छ करून घ्या. ही ट्रिक अल्युमिनिअमच्या भांड्यावर अत्यंत पटकन लागू होते आणि स्टीलची भांडीही स्वच्छ करण्यास याची मदत होते.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा के ये 8 फायदे चौंका देगें आपको – 8 benefits of baking soda – AajTak
भांड्यांवरील काळे डाग हटविण्यासाठी बेकिंग सोडा हा पर्याय चांगलाचा फायद्याचा ठरतो. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी घालून पेस्ट बनवून घ्या आणि जळलेल्या भांड्याला ही पेस्ट लावा. ही पेस्ट लावल्यानंतर कमीत कमी साधारण १५ मिनिट्स भांडे तसेच ठेवा. त्यानंतर पुन्हा साबण घेऊन हे भांडे घासा. त्यावरील आलेली जळणाची परत निघायला मदत होते. भांडे पूर्वीसारखे तुम्हाला दिसून येईल.

व्हिनेगर

व्हिनेगरदेखील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरते. यामुळे जळलेली भांडी स्वच्छ करण्यास मदत मिळते. काही वेळ जळलेल्या या भांड्यामध्ये व्हिनेगर घालून ठेवा. नंतर थोड्यावेळाने थोडे गरम पाणी आणि डिशवॉश घालून हे भांडे घासा आणि स्वच्छ करा. याच्या वापराने तुम्हाला पुन्हा एकदा चमकदार भांडी मिळतील. तसंच व्हिनेगर वापरल्यास, तुम्हाला भांडी घासायला जास्त ताकद लावावी लागणार नाही.

टॉमटो सॉस

जळलेल्या भांड्यांवर टोमॅटो सॉस लावल्यास पुन्हा एकदा भांडी चमकवता येतात. यासाठी टोमॅटो सॉस भांड्यावर लावा. रात्रभर हे भांडे तसंच सॉस लाऊन ठेवून द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्क्रबर आणि साबणाच्या साहाय्याने हे भांडे घासावे. तुमचे भांडे पूर्वीसारखी चकमकीत तुम्हाला दिसेल. टोमॅटोमध्ये असलेल्या आंबटपणामुळे भांड्यावरील डाग निघायला मदत मिळते.

लिंबाचा रस

खरंतर पूर्वी पासून लिंबाचा रसाचा वापर हा भांडी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. अधिकांश साबणामध्ये लिंबाचा अर्क आपल्याला वापरलेला दिसून येतो. खराब भांड्यांसाठी आणि अगदी कपड्यांवरील डाग घालविण्यासाठीही लिंबाच्या रसाचा उपयोग करण्यात येतो. भांड्यांवरील जळलेले डाग काढण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. भांडे ज्या ठिकाणी काळे झाले आहे त्यावर लिंबू घासा अथवा लिंबाचा रस रगडा. त्यानंतर काही वेळ तसंच राहू द्या. लिंबाच्या रसातील अॅसिडमुळे हे डाग निघण्यास मदत मिळते. अगदी सहजतेने हे डाग स्वच्छ होतात.

Back to top button