MIvsKKR : चाहरचा कहर; जिंकणारा केकेआर हरला

चेन्नई : पुढारी ऑनलाईन

राहुल चाहरच्या भेदक गोलंदाजीसमोर कसलेली केकेआरची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि मुंबईने सामना १० चेंडूंनी सामना जिंकत हंगमातला आपला पहिला विजय साजरा केला. मुंबईने ठेवलेले १५३ धावांचे आव्हान पार करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली पण, चाहरने २७ धावात ४ विकेट घेत केकेआरची टॉप ऑर्डर उडवली. त्याला कृणाल पांड्याने ४ षटकात फक्त १३ धावा देत १ विकेट घेऊन चांगली साथ दिली. सामन्याच्या शेवटी बुमहार आणि बोल्ट यांनी टिच्चून मारा करत सामना निसटू दिला नाही. बोल्टने २७ धावात २ विकेट घेतल्या. केकेआरकडून सलामीवीर नितीश राणाने ४७ चेंडूत ५७ धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सचे १५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सलामी दिली. सलामीवीर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी ७२ धावांची सलामी देत सामन्यावर पकड मिळवली. पण, राहुल चाहरने गिलला ३३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर चाहरने राहुल त्रिपाठीला ५ धावांवर बाद करत केकेआरला दुसरा धक्का दिला.

त्रिपाठी बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार मॉर्गन आणि सेट झालेल्या राणाने केकेआरला शतक पार करुन दिले. पण, राहुल चाहरने पुन्हा एकदा कहर करत मॉर्गन आणि त्या पाठोपाठ ४७ चेंडूत ५७ धावा करणाऱ्या राणाला बाद करुन केकेआरची अवस्था १५ षटकात ४ बाद १२२ धावा अशी केली. सामन्यात पुनरागमन केलेल्या मुंबई इंडियन्सने लगेचच अनुभवी शाकिब अल हसनला ( ९ ) बाद करत केकेआऱचा निम्मा संघ माघारी धाडला.

केकेआरचा निम्मा संघ माघारी गेल्यामुळे आता त्यांची भिस्त अनुभवी दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांच्यावर होती. केकेआरला आता विजयासाठी २४ चेंडूत ३० धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत या दोघांनाही हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. याच दबावात रसेलने कृणाल पांड्याला मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला असता पण, बुमहारने त्याचा झेल सोडला.

आता केकेआरला विजयासाठी १२ चेंडूत १९ धावांची गरज होती. बुमराहने या षटकात फक्त ४ धावा दिल्याने आता केकेआरला अखेरच्या षटकात विजयासाठी १५ धावांची गरज होती. स्ट्राईकवर आंद्रे रसेल होता. त्याने १ धाव करुन स्ट्राईक दिनेश कार्तिककडे पास केले. आता केकेआरला ५ चेंडूत १४ धावांची गरज होती. कार्तिकलाही एकच धाव करता आली. त्यामुळे केकेआरला आता ४ चेंडूत १३ धावांची गरज होती. पण, बोल्टने रसेलला बाद करत केकेआरला पराभवाच्या खाईत ढकलले. आता केकेआरला ३ चेंडूत १३ धावांची गरज होती. क्रिजवर कमिन्स आला त्यालाही बोल्टने बोल्ड करत केकेआरला २ चेंडूत १३ धावांचे अत्यंत अवघड आव्हान दिले. हरभजनने पुढच्या चेंडूवर २ धावा केल्या. आता केकेआरला १ चेंडूत ११ धावांची गरज होती. पण, बोल्डने शेवटचा चेंडू डॉट टाकत सामना १० धावांनी जिंकून दिला.

तत्पूर्वी, केकेआर विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. ख्रिस लिनच्या जागी संघात आलेला क्विंटन डिकॉक दुसऱ्याच षटकात २ धावात बाद झाला. पण, त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने आल्यापासूनच केकेआरची धुलाई करण्यास सुरुवात केली. त्याने आणि रोहितने मुंबईला ९ षटकात ७० धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्यानंतर सूर्यकुमारने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने २५ धावा करत सावध फलंदाजी करत होता. अखेर शाकिबने ५६ धावांवर सूर्यकुमारला बाद करत मुंबईचा दुसरा फलंदाज बाद केला. सूर्यकुमारने ३६ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकार मारत या ५६ धावा केल्या.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या इशान किशनला फार काही करता आले नाही. तो पॅट कमिन्सचा अखूड टप्याचा चेंडू फटकावण्याच्या नादात १ धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत १३ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. त्याने १५ व्या षटकात मुंबईला ११५ धावांपर्यंत पोहचवले. तोही आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. पण, कमिन्सने त्याला ४३ धावांवर त्रिफळा उडवत मुंबईला चौथा धक्का दिला. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईची सर्व मदार हार्दिक पांड्या आणि कारयन पोलार्ड यांच्यावर होती. मात्र प्रसिद्ध कृष्णाने हार्दिकला १५ धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला.

त्यानंतर केकेआरच्या आंद्रे रसेलने फक्त दोन षटके टाकत निम्या मुंबई इंडियन्सच्या संघालाचा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने पोलार्ड आणि मार्को जेनसेनला बाद करत मुंबईची अवस्था ७ बाद १२६ अशी केली. त्यानंतर त्याने सामन्याचे २० वे षटक टाकत कृणाल पांड्या बुमराह आणि चाहरला बाद करत मुंबईचा डाव १५२ धावात संपवला.

Back to top button