BAFTA 2021 : प्रियांका चोप्राने बाफ्टा सोहळ्यात फक्त शर्ट घातला; आतमध्ये काहीचं..

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

चित्रपटातील चर्चित पुरस्कार ब्रिटिश ॲकेडमी ऑफ फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन ॲवॉर्ड्स (BAFTA) मध्ये यावर्षी अनेक चित्रपट आणि कलाकारांनी मजल मारली. बाफ्टामध्ये हिंदी चित्रपटातील दोन दिग्गज कलाकार इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्‍यात आली. या सोहळ्यात देसी गर्लनेदेखील सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

वाचा – इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; चित्रपटाचा टिझर रिलीज

प्रियांका या सोहळ्यात स्टायलिश अवतारात दिसली. पती निक जोनाससोबतचा फोटो तिने इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केला आहे. तिने दोन लुक्स केले. यामध्ये प्रियांकाने ब्लॅक रंगाचा एक बटरफ्लाय थाय-हाय स्लिट गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या लुकमध्ये पिंक रंगाचा रिवीलिंग जॅकेट आणि स्टायलिश व्हाईट ट्राउजर परिधान केला होता. या लूकमध्ये प्रियांकाची हेअरस्टाईलही हटके होती.

प्रियांकासोबत निक जोनासनेदेखील उपस्थिती लावली. तसेच फोएब डिनेवोर, असिम चौधरी, सोफी कुकसन, चिवेटल एजियोफोर, सिंथिया एरिवो आणि ह्यूग ग्रांटसह अन्य सेलेब्सनीदेखील हजेरी लावली. कोविड -१९ महामारीमुळे हा सोहळा याआधी स्थगित करण्यात आला होता. या सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले. यामध्ये आठ विभागातील विजेत्य़ांची घोषणा करण्यात आली.

बाफ्टा सोहळा १० आणि ११ एप्रिल रोजी लंडनच्या रॉयल अलबर्ट हॉलमध्य़े ऑनलाईन आयोजित करण्यात आला. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार ‘द व्हाईट टायगर’ अभिनेता आदर्श गौरवला नव्हे तर ‘द फादर’ फेम अभिनेता एंथनी हॉपकिन्सला घोषित झाला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘नॉमलँड’ने आपल्या नावे केला.

पाह विजेत्यांची पूर्ण यादी –

बेस्ट फिल्म- नोमाडलँड

बेस्ट एक्टर- एंथनी हॉपकिन्स ( द फादर)

बेस्ट एक्ट्रेस- फ्रांसिस मॅकडोरमँड (नोमाडलैंड)

सपोर्टिंग एक्ट्रेस- युह जुंग योन (मिनारी)

सपोर्टिंग एक्टर- डॅनी कलय्यू श्रजुदास अँड द ब्लॅक मसीहा

बेस्ट शॉर्ट फिल्म- द प्रेजेंट, फराह नबुल्सी

आउटस्टँडिंग ब्रिटिश फिल्म- प्रॉमिसिंग यंग वुमन

बेस्ट डायरेक्टर- Chloé Zhao (नोमाडलँड)

ओरिजनल स्क्रीनप्ले- प्रॉमिसिंग यंग वुमन

एडॅप्टेड स्क्रीनप्ले- क्रिस्टोफर हॅम्पटन, फ्लोरियन जेलर ( द फादर)

ब्रिटिश रायटर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर आउटस्टँडिंग डेब्यू- रेमि वीक्स (हिस हाऊस)

जे चित्रपट इंग्लिश भाषेत नाही- थॉमस विटरबर्ग, सिस्से ग्रॉम (अनादर राउंड)

डॉक्यूमेंट्री- पिप्पा एहरलिच, जेम्स रीड, क्रॅग फोस्टर (माय ऑक्टोपस टीचर)

ओरिजनल स्कोर- जोन बॅटिस्टि, ट्रेंट रेनजर, एटीकस रोज (सोल)

ॲनिमेटेड फिल्म- पेटे डॉक्टर, डाना मुरे (सोल)

कास्टिंग- लूसी पॅरडी (रॉक्स)

सिनेमाटोग्राफी- जोशुआ जेम्स रिचर्ड्स (नोमाडलँड)

एडिटिंग- मिक्केल ई.जी नीलसेन (साउंड ऑफ मेटल)

स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स- टेनेट, स्कॉट फिशर, अँड्रयू जॅक्सन, अँड्रयू लॉक्ले

ब्रिटिश शॉर्ट ॲनिमेशन- मोल हिल, लॉरा डनकाल्फ ( द आउल एंड द पुसी कॅट)

ब्रिटिश शॉर्ट फिल्म- फराह नबुलसी(द प्रेजेंट)

ईई राइसिंग स्टार अवॉर्ड- बुक्की बॅकरे

प्रोडक्शन डिजाइन- मँक, डोनाल्ड ग्रॅहम बर्ट, जॅन पास्केल

ब्रिटिश शॉर्ट ॲनिमेशन- द आउव अँड दा पुसी कॅट, मोल हिल, लॉरा डनकाल्फ

साउंड- साउंड ऑफ मेटल, जॅमि, निकोलस बेकर, Phillip Bladh, कार्लोस, Michelle Couttolenc

कास्टिंग- रॉक्स, लूसी पार्डी

कॉस्ट्यूम डिजाइन- मां रॅने, एन रॉथ

मेकअप अँड हेअर- मा रॅने ब्लॅक बॉटम, मॅटिकि एनॉफ, लॅपी एम चॅरी, सर्जियो लोपेज, मिया नील

Back to top button