कोणत्याही दुकानातून रेशन फायद्याची योजना

रेशन धान्य योजना
रेशन धान्य योजना

शांताराम वाघ

कोणत्याही दुकानातून रेशनकार्डधारकांना धान्य घेता येईल, तसेच पैसे नसल्यास दोन किंवा तीन हप्त्यांत पैसे देता येतील, ही योजना देशातील 81 कोटी लाभार्थ्यांना त्यांचा सहज फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत सर्व धान्य दुकानांत पीओएस यंत्रे बसवली जातील. आधार कार्ड किंवा पॅन कार्डद्वारे ग्राहकाला ओळख पटवून द्यावी लागेल. एफसीआयने सर्व 563 कोठारे आणि सीडब्ल्यूसीने 144 डेपो ऑनलाईन सिस्टीमशी जोडले आहेत. यामुळे धान्याच्या काळ्या बाजाराला आळा बसणार आहे. रेशनकार्ड आधारला जोडल्यानंतर 2.72 कोटी बनावट रेशन कार्ड समोर आली होती. मुळात गरिबांना ही योजना खूप फायदेशीर ठरू शकेल आणि सर्वात महत्त्वाची बाब तीच आहे. कारण, सर्वांना पुरेसे अन्‍न मिळाले तरच देशाचे भविष्य सुधारणार आहे.

 

Back to top button